शपथविधीनंतर अजित पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : राष्ट्र्वादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत राज्यात भूकंप आणला आहे. या शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विरोधी पक्षांची बैठक होते त्यामध्ये आऊटपूट काही निघत नाही. भारत देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. याचा विचार करता आम्ही सगळ्यांनी तशाप्रकारचा निर्णय घेतलं. आज शिंदे-फडणवीस सरकारचं काम करत आहे. मी इतके दिवस विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझी भूमिका स्पष्ट केली होती, असं अजित पवार म्हणालेत.

🤙 8080365706