राज्याला दोन उपमुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : राजभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून यानिमित्ताने राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“जे घडलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं घडलं आहे. यातून महाराष्ट्रात एक विकासाचा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी तिघं मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ. अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारं सरकार आम्ही देवू,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

🤙 8080365706