
सध्याच्या काळात स्मार्ट फोन हा प्रत्येकासाठी खूप गरजेचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोबतच स्मार्टफोन ठेवत असतो. पण आता पावसाळ्याच्या दिवसात जर का आपला फोन पाण्यात भिजला तर आपण काय केले पाहिजे चला जाणून घेऊयात.

तुमचा भिजलेला फोन कोरडा करण्यासाठी कापड किंवा पेपर टॉवेल वापरा. फोन घासू नका, कारण असे केल्याने चुकून फोनच्या अधिक संवेदनशील भागांमध्ये पाणी जाऊ शकते. जर फोन पूर्णपणे बुडला असेल, तर तुम्ही अधिक पाणी बाहेर काढण्यासाठी फोनच्या क्रिझ आणि ओपनिंगभोवती हळूवारपणे व्हॅक्यूम करण्याचा प्रयत्न करू शकता.
तुमच्या फोनमध्ये पाणी गेल्यास त्यातील बॅटरी त्वरित काढा.परंतु सध्या बाजारात येणारे बहुतांश फोन हे इनबिल्ड बॅटरीसह येतात. त्यामुळे बॅटरी काढणे शक्य होत नाही. अशावेळी फोनला त्वरित स्विच ऑफ करून सुकवण्याचा प्रयत्न करा.पावसाळ्यात फोन भिजला की तो सुकवण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करतात. मात्र, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. यामुळे फोनच्या चिपचे नुकसान होऊ शकते. फोनला सुकवण्यासाठी तुम्ही थेट सूर्यप्रकाशाची अथवा पंख्याच्या हवेची मदत घेऊ शकता. यामुळे फोनच्या मदरबोर्डवरील चिपमध्ये ओलावा राहत नाही. तसेच फोनला सुकवण्यासाठी तांदूळ देखील उपयोगी येतील. जर तुमचा फोन भिजला असेल तर तुम्ही फोनला काहीकाळ तांदळात देखील ठेऊ शकता.
