
कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट सर्व माजी नगरसेवक, श्रीराम विकास सेवा संस्थात तर्फे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थीनींचे भव्य सत्कार सोहळा आयोजित करणेत आला होता.

कसबा बावडा लाईनबार परिसरातील मार्च २०२३ च्या इयता १० वी व १२ वी परिक्षेत अंदाजे 500 च्यावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांचा सत्कार व पुढील करियरसाठी मार्गदर्शन असा संयुक्त समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की बैंक ऑफ इंडिया, शाखा का बावडा यांचेकडून विद्याथ्यांना शैक्षणिक कर्ज व बैंकिंग सुविधा इ. बाबत मार्गदर्शन घ्यावे आणि दहावी बारावीनंतर अनेक विद्यार्थी व पालक गोंधळलेले असतात अशावेळी आपल्या मुलाची कास आणि त्याची आस कुठे आहे हे पाहून त्या ठिकाणी करिअर करण्यास मदत करावी शासनाच्या किंवा बँक ऑफ इंडिया सारख्या वित्तीय संस्थेद्वारे उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य घ्यावे तसेच सारथी सारख्या संस्थे चा उपयोग आपल्या मुलाच्या करिअरसाठी पालक यांनी करून घ्यावा व मुलांची करिअर करावे असे त्यांनी सांगितले उत्तर कोल्हापूरचे आमदार जयश्री जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शासकीय स्तरावरील सर्व योजनेसाठी मी आमदार म्हणून निश्चितपणाने सहकार्य करेन असे सांगितले शासकीय स्तरावरील सर्व बँका व वित्तीय संस्थेचा गाढा अभ्यासक डॉ. विलास पाटील यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी पालक यांना भरपूर मार्गदर्शन मिळाले डॉ. विलास पाटील आपल्या भाषणांमध्ये म्हणाले की विद्यार्थी यांनी आपल्या करिअरची सुरुवात दोन हस्तक आणि मस्तक यांच्याद्वारे करून वेळ श्रम आणि कष्ट वाया घालवून देता योग्य ती दिशा आत्मसात करावी.
आई-वडिलांची इच्छा पूर्ण करा तसेच आपल्या धर्मातील सर्व जाती जमातीसाठी वित्तीय संस्था आहेत महामंडळे आहेत त्यांच्या वित्तीय व शिक्षणाच्या आर्थिक साह्याची मदत घेऊन उच्च शिक्षण आत्मसात करा आयएएस साठी पुण्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्था आज तागायत तेराशे विद्यार्थ्यांना आयएएस करण्यात मोठी यश प्राप्त केले आहे कसबा बावड्याचे दिव्या पाटील ट्रस्ट आणि श्रीराम संस्था यांच्याद्वारे अतिशय मोठा कार्यक्रम हा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देण्यासाठी आमच्या अनेक मार्गदर्शन सल्ला देणाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित करून अनेक पालक सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी, यांची कुचुंबना दूर केली आहे भविष्यात सारखी सारख्या संस्थेवर आदरणीय आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून मी सारथी या संस्थेवर काम करण्यास इच्छुक असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थी व पालक यांची कुचुंबना दूर करू इच्छितो अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांचे मौलिक मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभले यावेळी राम संस्थेचे चेअरमन व्हा चेअरमन पालक.
आमदार सतेज उर्फ बंटी डी.पाटील आणि माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्यआमदार ऋतुराज पाटील आमदारआमदार जयश्रीताई जाधव आमदार कोल्हापूर उत्तर व्याख्याते . डॉ. विलास पाटील पुणे मोहन सालपे उर्फ पापा माजी महपौर स्वाती येवलुजे माधुरी लाड श्रीराम संस्थेचे चेअरमन व्हा चेअरमन सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यकम श्रीराम सांस्कृतिक भवन श्रीराम सोसायटी, कसबा बावडा, येथे आयोजित करणेत आला होता प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थीनीचा सत्कार व भेट वस्तू देण्यात आले.
