
मलकापूर :अखिल गुरव समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव याची निवड करण्यात आली आहे.

अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी बैठक आज पार पडली.या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. अजय गुरव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलकापूर शहर अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत.आतापर्यंत त्यांनी बऱ्याच माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक सामाजिक आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर समाजाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.यावेळी बोलताना अजय गुरव म्हणाले, समाजाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे त्या पदाला 100 % न्याय देण्याचे काम मी प्रामाणिकपणे करेन.
संघटना मजबूत करण्याकडे जास्त लक्ष देणार असून लवकरच समाजाचा भव्य मेळावा घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अखिल गुरव समाज संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, आप्पासाहेब गुरव ,विलास पाटील, शिवप्रसाद गुरव, स्मिताराणी गुरव ,आशाराणी गुरव, सुनिता गुरव, अशोक गुरव ,बाजीराव गुरव, कृष्णात गुरव ,एकनाथ गुरव, सदाशिव गुरव ,मारुती सातार्डेकर आदी उपस्थित होते.
