समृद्धी महामार्ग शापित, या रस्त्यात अनेकांचे अश्रू; संजय राऊत

मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचं मला वाटतं, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावर राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आज 26 लोकं मरण पावली. हे दुर्देव आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी या सरकारने मनमानी केली, त्याच्या अनेक गोष्टी बाहेर येतील. दुर्देवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही.

🤙 8080365706