ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र

मुंबई : ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे. कोरोना काळातील सर्व खर्चाचे तपशील ईडीने मागवले आहेत.

लाईफलाईन कंपनीशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणात चौकशीसाठी ही कागदपत्रे मागवण्यात आले आहेत. सध्याचे प्रशासक आणि पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.अधिकारी चौकशीच्या ससेमिऱ्यातकोरोना काळातील कथित टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे मुंबई महापालिकेचे तत्कालीन आणि सध्याचे अधिकारी देखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मुंबई महापालिकेने एकूण किती खर्च केला, किती टेंडर काढली आणि कुठल्या कंत्राटदारांना ती देण्यात आली होती या सगळ्यांची माहिती ईडीकडून मुंबई महापालिकेकडे मागवण्यात आली आहे.

🤙 8080365706