भाजपा शिष्टमंडळाचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यात भाजपा-शिवसेना (शिंदे) सरकार सत्तेत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीपद बहाल करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जातो.

परंतु जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी याविषयात लक्ष न दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. याविषयात लक्ष देत भाजपा शिष्टमंडळाने प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज विशेष कार्यकारी अधिकारी पदांच्या नियुक्ती विषयात निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेऊन प्रलंबित नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित करून या प्रक्रियेतील वेळकाढू पणाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून याबाबत जाब विचारला. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभाग अजूनही २०१५ च्या जीआर नुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे काम करत असल्याचे शिष्टमंडळाला दिसून आल्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने थेट या कार्यालयासाठी अद्यावत मे २०२३ चा सुधारित जीआर प्रिंट काढून सुपूर्त केला.सुधारित जीआर नुसार नव्याने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा अधिकार पालकमंत्री व स्थानिक प्रशानाला आहे त्यामुळे या नियुक्त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पालक मंत्र्यांचे पत्र मिळताच नियुक्त्या तात्काळ करण्याचे आश्वासन दिले. सध्याचे पालकमंत्री हे पर्यटन मंत्री असल्या सारखे वागत असून त्यांच्या निष्क्रियपणामुळे कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी सारख्या पदांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे भाजपा शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही पदे त्वरित जाहीर करावी अशी मागणी करणार आहेत.

🤙 8080365706