
पुणे : सरकारी नोकरी अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. सरकारच्या या उपक्रमास पुणे शहरातून प्रथम प्रतिसाद मिळाला आहे. पुणे शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु झाल्या आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी स्थूलत्व उपचार व प्रतिबंध अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे वजन कमी करुन त्यांचा लठ्ठपणा कमी केला जाणार आहे.
