
मुंबई : ईडीने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला बदनाम करण्यासाठीच ही छापेमारी सुरू केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे.

ठाकरे गटाने 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. त्यापूर्वी विविध समस्यांसाठी सांताक्रुझ येथील महापालिकेच्या एच पूर्व विभागावर मोर्चा काढला होता. या जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलं होतं.
