
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथे रस्ता खचल्याने दोन ट्रक महामार्गावरच फसले आहेत.

रस्त्याच्या मध्ये या वाहने अडकल्याने रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. नाणीज शाळेजवळचा रस्ता काल रात्री खचला. आठ तासाहून अधिक काळापासून वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.
रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. केवळ लहान वाहनांची वाहतूक सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती असल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनाधारकांना गाड्या चालवणे कठिण होत आहे.
