
पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे.

येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. पुणे येथील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात उड्डाण पुल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे गर्डर उभारणीचे काम ४ ते १५ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात येणार आहे. हे काम रात्री १२.३० ते पहाटे ३.३० दरम्यान करण्यात येणार आहे. यामुळे तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक महामार्गालगत असणाऱ्या पर्यायी रस्त्यांवर म्हणजे साईड रोडने वळवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
