
गारगोटी: वर्णभेदाची जाती भेदाची, कर्मकांडांची हिंदू धर्मावर चढलेली जळमटे दूर करून मानव धर्म म्हणजे हिंदू धर्म अशी मांडणी कृतीतून संतांनी केली म्हणूनच आज पर्यंत हिंदू धर्म टिकून आहे मनुस्मृति म्हणजे हिंदू धर्म नसून संत तुकारामांच्या पासून रोहिदास, कबीर, अलीकडचे गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या संतांनी अभंगातून मांडलेला धर्मच खरा धर्म आहे असे मत डॉ. राजीव चव्हाण यांनी हिंदू धर्म आणि संत परंपरा या विषयावर बोलताना अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी तर्फे आयोजित केलेल्या विविध धर्मांच्या व्याख्यानमालेत केडी देसाई हॉलमध्ये व्यक्त केले.

या व्याख्यानाला भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई, डॉ. के के मोमीन, प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार, इंजिनियर नंदकुमार मोरे ,ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सोळसे अकॅडमीचे अध्यक्ष डॉ सुभाष देसाई ज्येष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा वृषाली देसाई व अनेक नामवंत विविध धर्माचे लोक उपस्थित होतेडॉक्टर राजीव चव्हाण यांनी विविध संदर्भ देत असा विचार मांडला की खऱ्या संतांची परंपरा खंडित झाल्यामुळेच हिंदू धर्माच्या नावावर जनतेची दिशाभूल करून समाजात आज दंगली भडकवल्या जात आहेत आपण विविध धर्मातील साम्य शोधत आहोत आणि म्हणूनच या अकॅडमी तर्फे भारतीय राज्यघटनेचा सर्वधर्मसमभाव जोपासला जातो.डॉ मोमीन यांनी सांगितले की जगभर मानवी शरीर रचना शास्त्र एकच आहे आणि त्यामुळे मानवातील जाती धर्म भेद हे खोटे आहेत जर निसर्ग तुम्हाला एकता शिकवत असेल तर तुम्ही भेदाभेद करणे चुकीचे आहेअकॅडमी चे अध्यक्ष डॉक्टर सुभाष देसाई यांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीतून हिंदू धर्मावर थोडक्यात भाष्य केले आणि पावसाळ्यानंतर गारगोटी मध्ये सर्वधर्म संमेलन घेण्याची घोषणा केली त्यानंतर प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी या सूचनेचे स्वागत करून आपण अभूतपूर्व अशा पद्धतीने सर्व धर्म संमेलनाची आखणी करू आणि त्यासाठी सर्वजण सहकार्य करतील असे आश्वासन दिले आपल्या भाषणात ते म्हणाले पूर्वीचा गाव गाडा विचारात घ्या आणि बळीराजाची संस्कृती ही आपली संस्कृती आहे हे विसरू नकाज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सोळसे म्हणाले भारतीय राज्यघटनेचा मान राखण्यासाठी आपण येथे एकत्र येतो विविध धर्मावर चर्चा करतो हे रोपटे भविष्यामध्ये विशाल वटवृक्षांमध्ये रूपांतर होईल अशी मला खात्री आहेनंदकुमार मोरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि त्यापूर्वी या सभेमध्ये भारतीय स्वातंत्र्य राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे चा जाहीर निषेध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आणि भिडेवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी शासनाकडे मागणीही करण्यात आली.
