भोगावतीच्या ‘ विद्यमान अध्यक्षांचा उमेदवारी अर्जच दाखल नाही ; पी.एन पाटलांची निवडणुकीतून माघार

कोल्हापूर : परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि अनेकांची उमेदवारी अर्जासाठी चढाओढ सुरू झाली.कारखान्याचा अध्यक्ष किंवा संचालक होण्यासाठी बहुदा सर्वच उत्सुक असतात.या सगळ्यामध्ये पी.एन .पाटील यांचं वेगळेपण जाणवतंय.कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

आमदार पी .एन पाटील यांची कारखान्यावर एक हाती सत्ता असून 1989 पासून फक्त पाच वर्षांचा अपवाद वगळता आजपर्यंत त्यांनी कारखान्यावर सत्ता अबाधित राखली आहे. सलग तीस वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर संचालक मंडळ कार्यरत आहे. गेली पाच वर्षे अध्यक्षपदावर काम करत असताना साखर उद्योग आणि कारखाना अडचणीत असूनही त्यांनी कारखान्याची घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला आहे .पण आता त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीपासून दूर राहून कोल्हापूरलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या त्यागाची चर्चा राज्यभर होत आहे.

🤙 8080365706