
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात जारदार पाऊसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगड किल्ल्याला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला असून पायथ्यालगतच्या दरीवरील दगडी बुरुज कोसळला आहे.,

विशाळगड येथील बुरूज हा मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत पुरातत्वविभागाकडे याच्या दुरूस्तिची मागणी कऱण्यात आली होती. मात्र विभागाच्या दुर्लक्षामुळे हा बुरूज अखेर कोसळला आहे. यामुळे शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
