नामांतराबाबत शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं जावं अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली होती. याचसंदर्भातील निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

🤙 8080365706