पुण्यात कोयता हल्ला होत असताना लोकांची बघ्याची भूमिका : राज ठाकरे नाराज

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत दिवसाढवळ्या एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे. मदतीला कोणीही पुढे न धावल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. तरुणीवर हल्ला होत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी जाहीर केली आहे.

पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

🤙 8080365706