करवीर शिवसेनेची महावितरण समोर निदर्शने

कोल्हापूर : उचगांव येथील हनुमान कॉलनी, हिरा कॉलनी, ब्रम्हनाथ कॉलनी, शाहु मिल कॉलनी मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज ते बापट कॅम्प स्टेशन पर्यंतसुमारे ५ कि.मी. ची ३३००० केव्ही हायटेन्शन विजेची लाईन टाकरण्यात आली असून सदर लाईन मधील ३.५ कि.मी. ही जमीनी मधुन (बंदीस्त) घेतली असून यातील उर्वरीत १.५ कि.मी. लाईन ही रहिवाशी विभागातुन गेली आहे. या लाईनला चार वर्षा पूर्वी शॉक लागुन दोन महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. सदर लाईन खाली छोटे छोटे प्लॉट धारकांनी आपली घरे बांधली आहेत. सदर घरा जवळून ही लाईन जात असल्याने ती बंद करण्यात आली होती. परंतु आपल्या विज वितरण कार्यालया कडून पुन्हा ही लाईन चालू करण्यात येणार असून या लाईन मुळे तेथे राहणाऱ्या अनेक कुटुंबाच्या जिवीतास धोका निर्माण होणार असून सदर लाईन ही काढून टाकण्यात यावी किंवा जमिनीतुन (बंदीस्त) करण्यात यावी. तेथे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या जिवीतास हानी पोहचल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल व आपल्या खात्या विरोधात तेथील रहिवाश्यांना घेवून करवीर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने मा.विकास रामचंद्र शिर्के,अतिरिक्त कार्यकारी अभियंता व मा. निवास गावडे, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग, बापट कॅम्प,कोल्हापूर यांना देण्यात आले.

यावेळी अधिकाऱ्यांनी तेथील रहिवाशांच्या जीवाशी खेळून कोणतेही काम होणार नाही तेथील नागरिकांचा विरोध असेल तर त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय विजेची लाईन कोणत्याही परिस्थितीत चालू केली जाणार नाही. असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, हिंदुत्ववादी शरद माळी, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव, युवासेनेचे सचिन नागटीळक,योगेश लोहार, वाहतूक सेनेचे दत्तात्रय फराकटे,अजित चव्हाण, राहुल गट्टे, विठ्ठल फराकटे, अवधूत हरणंदे, संदीप भोसले, आदेश खिस्ते, सागर माने, राजू कोळेकर, सौरभ चौगुले, सोहम परांजपे, निखिल खिस्ते, विनायक नाईक आदी उपस्थित होते.

🤙 8080365706