टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ

दिल्ली : टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.  मान्सून सुरु होताच दिल्लीतील जनतेला महागाईचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता 100 रुपये किलोने विकला जात आहे. याशिवाय भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबी यासह अनेक भाज्यांचे भाव चांगलेच वधारले आहेत.

🤙 8080365706