
कोल्हापूर : रेंदाळ तालुका हातकणंगले येथे राज्यस्तरीय शाहू गौरव पुरस्कार सोहळा 2023 संपन्न झाला. यावेळी आदर्श वैद्यकीय सेवा रत्न पुरस्कार संभाजी पाटील अध्यक्ष करवीर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ग्रामपंचायत सदस्य भुयेवाडी यांचे आज पर्यंतचे वैद्यकीय व सामाजिक कार्याची उल्लेखनीय दखल घेऊन त्यांना सावित्रीच्या लेकी बहुउद्देश महिला मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आला.

यावेळी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ. सोलुनी पुजारी व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
