
साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
कोल्हापूर: कोल्हापूरच्या हरितक्रांतीचे जनक, आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा मांडणारा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा पहिला राजा राजर्षी शाहू महाराजांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व माजी उपसरपंच सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले गगनगडाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. प्लास्टिक मुक्ती, वृक्षारोपण, अमंली पदार्थ विरोधी घोषणा देऊन सामाजिक उपक्रमांच्या साह्याने गगनबावडा वासियांच्या वतीने लोक राजाला अभिवादन करण्यात आले.गगनबावडा तालुक्यातील अनेक शाळा ,महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध स्पर्धा, स्वच्छता मोहीम यासारखे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
सोबत गगन बावडा पोलिस स्टेशन चे दिपक भांडवलकर, महावितरण चे जाधव , बावेलीचे सरपंच युवराज कदम ,सुनील हारुगले ,श्रीकांत कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) लखमापूर संभाजी पाटील (पत्रकार) व खेरीवडेचे सर्जेराव पाटील मा. उपसरपंच, अमर कुंभार(AK), वसंत पाटील चेअरमन , राजेश पाटील (सचिव), युवराज वर्धन सागर प्रभु दूध संस्था चेअरमन, राजाराम पाटील, बाळू दिनकर पाटील गावातील पदाधिकारी तसेच धामणी खोऱ्यातील समस्त ग्रामस्थ
