स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालया समोर आज आकिवाट चे माजी सरपंच विशाल चौगुले व कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे नियोजित विमलनाथ चौगुले विकास सेवा सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. सदर सेवा सोसायटीस आवश्यक कर्ज पुरवठा करत असल्याचा जिल्हा बँकेचा दाखला गेल्या चार महिन्यापासून मागणी करण्यात येत आहे. मात्र काही संचालकांच्या राजकीय सूडबुद्धीने व मनमानी कारभारामुळे सदर दाखला देण्यास बँक प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली आहे. वारंवार बँकेकडे मागणी करूनही बँकेने अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला न दिल्यामुळे सदर संस्थेचे संचालक सभासद व जिल्ह्यातील स्वाभिमानीचे प्रमुख कार्यकर्ते या मनमानी कारभारी विरोधात आजपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात अमरण उपोषणास सुरुवात केली आहे.शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे नवीन विकास सेवा सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. याआधी तालुक्यांमध्ये जवळपास दहा ते अकरा नवीन सोसायटी चा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सदर सोसायटी यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज पुरवठा करत असलेला दाखला घेणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणेच याही सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्ज पुरवठा करत असले बाबतचा दाखल्याची मागणी केली. दरम्यान बँकेतील संचालकाने राजकीय आकसापोटी व सूडबुद्धीने या संस्थेला दाखला देण्यात येऊ नये या पद्धतीच्या सूचना देऊन संस्थेच्या संचालक मंडळास चार महिने हेलपाटे घालण्यास भाग पडले. दरम्यानच्या काळात याच जिल्हा बॅंकेच्या संचालकाच्या निकटवर्तीयांच्या सोसायटींना मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कोणत्याही कागदपत्रांची व नियमाची तपासणी न करता संचालकाच्या सांगण्यावरून कर्ज पुरवठा करत असल्याचे दाखले देण्यात आले आहेत. दरम्यान विरोधी गटातील संस्था नोंदणी होणार हे लक्षात आल्यानंतर या संचालकांने याबाबतीत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर प्रस्तावास टाळाटाळ करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सदर प्रस्तावाची पूर्ण छाननी करण्यात आली व काही तांत्रिक कारणे सांगत बँकेकडून टाळाटाळ करण्यात आले आहे. मात्र संस्थेने ही चिकाटीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जाणीवपूर्वक या संस्थेला दाखला देण्यास टाळाटाळ केले. नियोजित संस्थेच्या सभासदांना अपेक्षित कर्ज पुरवठा होणारी रक्कम ही जिल्हा बँकेकडून कमी दाखवण्यात येऊ लागली.

वास्तविक पाहता नियोजित संस्थेच्या सभासद यादीतील सभासदांनी संबंधित गावातील तीनही विकास सेवा सोसायटीने या संस्थेस नोंदणी करण्यास ना हरकत दाखला दिले आहे. मात्र जाणीवपूर्वक राजकीय सुडबुद्धीने जिल्हा बँकेकडून काही कारणे दाखवून संस्थाधारकांना नाहक त्रास दिला जाऊ लागला आहे. यापूर्वीही तीन तीन चार चार वर्षे जिल्ह्यातील अनेक पतसंस्था, सेवा सोसायटी, कृषी प्रक्रिया संस्था यांनी सभासदासाठी अर्ज करूनही बँकेकडून त्यांना सभासद करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. संबंधित संचालकांनी जर या संस्थांच्या सभासद होण्यास विरोध केला तर त्या संस्थांचे सभासद करून घेण्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नकार दिला जात आहे. या सर्व प्रकारास कंटाळून जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असल्याने व सेवा संस्थांची लीड बँक असल्याने अकिवाट येथील सभासद शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज सकाळपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमरण उपोषणास सुरुवात केली आहेत.

🤙 8080365706