
बालिंगा : बहुजन पत्रकार संघ व परिवर्तन फौंउंडेशन कोल्हापूर यांचे वतीने आज राजर्षी शाहू महाराज यांचे जयंती निमित्त राजर्षी परिवर्तन शाहू पुरस्कार प्रदान कार्यक्रम शिवाजी मंदिर येथे संपन्न झाला.

यावेळी बालींगेचे गावचे रहिवासी व न्यूज मराठी ट्वेंटी फोर चे पत्रकार मोहन दिनकर कांबळे यांना हा पुरस्कार लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाचे उपअधीक्षक सरदार नाळेसाहेब व करवीरचे प्रांताधिकारी श्री धार्मिक साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याचवेळी डॉक्टर महादेव माने,गणेश खाडे, एक्साईज निरिक्षक गिरीश कुमार करचे,आकाश पाटील, यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार श्रीमंत छञपती शाहू महाराज यांचे हस्ते करून करण्यात आली.या वेळी विशेष सत्कार बीन्युजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी व दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यांनी कु. दिशा सुतार याचा करणेत आला.
या कार्यक्रमास धर्मादाय आयुक्त नायकवडे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गिरीश कुमार करचे, अक्षय साळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताज मुल्लाणी यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार फौंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले.
