
राधानगरी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक पुढारीचे पत्रकार आशिष पाटील( गुडाळकर) यांना देण्यात आला.

पाटील यांनी शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात पत्रकारितेची पदवी घेतली असून गेली अठ्ठावीस वर्षे ते दैनिक पुढारी मध्ये राधानगरी तालुक्यातून पत्रकारिता करत आहेत. आज छत्रपती शाहू जयंती चे औचित्य साधून जि.प. च्या राजश्री शाहू सभागृहात पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बाजार समितीचे माजी संचालक सदानंद कोरगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आशिष पाटील यांना सपत्नीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
