पंचायत समिती, भुदरगड येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

गारगोटी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त आज पंचायत समिती, भुदरगड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास के.डी.सी.सी.बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की, कोल्हापूरसारख्या अन्य संस्थांनांच्या तुलनेत छोट्या असणाऱ्या संस्थानाला केवळ राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यामुळे देशपातळीवर लौकिक प्राप्त झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होते त्यांनी आरक्षणाची प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने आपल्या संस्थानात प्रत्यक्षात अंमलात आणली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी आणि जलव्यवस्थापन या कार्याला तोड नाही. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय सुधारणा घडविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पी.एस.कांबळे सर, शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, व्ही.जे.कदम सर, जिल्हा कार्याध्यक्ष आर.एस.कांबळे, आर.पी.आय. तालुकाप्रमुख बबन कांबळे, अरुण कांबळे, के.टी.कांबळे सर, साताप्पा कांबळे, बाळू कांबळे, दयानंद माने, विजय थोरवत, जितेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

🤙 8080365706