
बारामती : यंदाच्या मौसमातील पहिल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली. या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड आणि मिलन सबवे परिसरात भेट देत आढावा घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं याबाबत प्रश्न विचारला असता, कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

BRS पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय होत आहे. त्यावर त्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, याची चिंता नाही. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर सेवा करायची असेल तर त्यांच्या स्वागत आहे. ते काय करत आहेत, लोक त्याला कसा प्रतिसाद देतील हे निवडणुकीनंतर दिसून येईलच, असं पवार म्हणाले.
