गोकुळचे दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ मुंबईमध्ये सर्वत्र उपलब्ध करणार : चेअरमन अरुण डोंगळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ ) च्या चेअरमनपदी निवड झाले बद्दल अरुण डोंगळे यांचा मुंबईतील दूध वितरकांच्यावतीने संघाच्या वाशी शाखा (मुंबई) येथे सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.

या सत्काराप्रसंगी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले,” १९८८ पासून गोकुळने मुंबईमध्ये दूध विक्री चालू केली आहे. संघाच्या जडणघडणीमध्ये मुंबईतील गोकुळच्या दूध वितरकांचे योगदान फार महत्वाचे आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गोकुळने नेहमीच सहकार्य केले आहे. यामुळेच नविन पिढीही या वितरण व्यवस्थेमध्ये उतरलेलीआहे. याचा मला आनंद आहे. सध्याच्या परिस्थितीत दूधविक्री वाढवण्यासाठी वितरकांनी गतिमान पद्धतीने कामकाज करावे असे आवाहन केले.

पुढे बोलताना डोंगळे म्हणाले की गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर दूध व दुग्धजन्य पदार्थ मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात मुंबईमध्ये दुधाबरोबरच मोठ्या प्रमाणात गोकुळचे तूप, पनीर, टेबल बटर ,लस्सी, ताक,दही, बासुंदी, टेट्रापॅकगमधील लस्सी, सुगंधी दूध अशी उत्पादने मुंबईतील ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार आहोत. तसेच गोकुळचे दुग्धजन्य पदार्थही मुंबईतील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यास सर्व वितरकांनी सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील (चुयेकर), बयाजी शेळके ,संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी वितरण व्यवस्थेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पांडुरंग एकशिंगे यांनी केले.एन टी पाटील यांनी आभार मानले .

या कार्यक्रम प्रसंगी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील ,संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील , संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, मार्केटिग अधिकारी हणमंत पाटील, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील तसेच मुंबई येथील गोकुळ चे वितरक अरविंद पाटील, श्री स्वामी,बाळू पाटील , जयवंत फाळके,राजू पाटील,विनय शिवतारे,नंदू पटवर्धन,संजय पाटील,शरमिन सयद,विनय शहा, व इतर दूध वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706