
मुंबई : केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे आरोग्यास धोका ठरू शकतात म्हणून हा निर्णय़ घेण्यात आले आहे.

या बंदी घातलेल्या औषधांमध्ये सर्दी आणि ताप यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा देखील समावेश आहे. ही औषध घेणं हानिकारक असल्याचे सरकारने म्हटले आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये निमेसुलाइड आणि विरघळणारे पेरासिटामॉल गोश्या तसेट क्लोफेनिरामाइन मॅलेट, कोडीन सीरप सारख्या औषधांचा देखील समावेश आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी)च्या या औषधांवर बंदी घाण्यात आल्याची माहिती एका अधिसूचनेतून देण्यात आली होती.
