पेपर फुटीस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकारी व शिक्षकांवर कारवाई करावी – मंजीत माने

कोल्हापूर : विद्यापिठाच्या बी कॉम तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विध्यार्थी यांच्या मोबाईलवर व्हाईरल झाल्या याला कारणीभूत कोण? विद्यापीठाच्या इतक्या सुरक्षेयंत्रनेत पेपर फूटतोच कसा? संबंधित अधिकारी झोपा काढतात की जाणून बुजून करतात असा सवाल करत युवा सेनेच्या वतीने विद्यापीठाला निवेदन देण्यात आले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे पेपर सुरु होण्यापूर्वी जर मुलांना मोबाईल वर पेपर मिळत असेल तर मग वर्षभर अभ्यास करणाऱ्या मुलांच्या वर आपण अन्याय करण्याचे ठरवळे आहे का?? शिवाय विद्यापिठाने SRPD सिस्टिम बंद करावी, व घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित किरण माने, जिल्हा चिटणीस अमित बाबर,युवराज मोरे, शहर युवाअधिकारी योगेंद्र माने, संतोष कांदेकर, उपशहर युवाअधिकारी प्रतीक भोसले, चैतन्य देशपांडे, रघु भावे, रोहित वेढे, युवतीसेनेच्या सानिका दामूगडे, अक्षय घाटगे राजेश्री मिणचेकर,आदर्श खडके, कीर्ती कुमार जाधव,,प्रथमेष देशिंगे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706