
दिल्ली : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेले भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभरातून दबाव वाढू लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या पंखांना कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याच समजत आहे.कैसरगंजचे भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात ७ महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दिल्ली पोलिसांमध्ये दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या तक्रारदारांपैकी एक कुस्तीगीर अल्पवयीन असल्याने ‘पॉक्सो’ या कायद्याखाली ब्रिजभूषण यांच्याविरोधात कारवाई केली जाऊन त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रिजभूषण सिंह यांनी ५ जून रोजी अयोध्येतील संतांच्या मदतीने आयोजित केलेले शक्तिप्रदर्शनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपामुळे रद्द करण्यात आलंय.
