कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची जोरदार टक्कर

ओडिशा: ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्थानकाजवळ थरकाप उडवणारा रेल्वे अपघात घडला असून कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर जोरदार झाली.

दोन ट्रेन व मालगाडीच्या भीषण अपघाताने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या अपघातामध्ये मोठी जीवीतहानी झाली आहे. आतापर्यंत या अपघातातील मृतांची संख्या २३८ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सेलिब्रिटी मंडळीही दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.या भीषण अपघातानंतर संपूर्ण देशच हादरुन गेला आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं. पण ही संख्या नंतर वाढत गेली. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य करण्याचे काम सुरु आहे. 

🤙 8080365706