
बालिंगा :(मोहन कांबळे) शाहुनगर परिते येथील भोगावती स.सा.का.लि. यांची २१ फेब्रुवारी पर्यंतची सर्व बिले बॅंक खात्यामध्ये जमा केलेली माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार पी.एन.पाटील -सडोलीकर यांनी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात ६९ हजार ६६७ मॅट्रिक टन उसाच्या बिलापोटी २१ कोटी ५९ लाख ७० हजार रुपये संबंधित ऊस उत्पादक शेतकरी यांचे खात्यावर वर्ग करणेत आलेली आहेत.
या हंगामात ऊसबिलापोटी १४२कोटी४८लाख ५६हजार ११२ रुपये, तर तोडणी वहातुक बीलापोटी २२कोटी१०लाख रूपये दिल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या वेळी व्हाईस चेअरमन उदयसिंह पाटील कौलवकर, कार्यकारी संचालक व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
