
कोल्हापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत बदनामीकारक लेखन करणाऱ्या इंडीक टेल्स या वेबसाईट कंपनीच्या विरोधात वीरशैव लिंगायत माळी समाज महिला मंडळ कोल्हापूर जिल्हा या संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला. दसरा चौक येथे शुक्रवारी सकाळी या कंपनीच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक आणि सामाजिक काम केले, त्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. अशा या पुरोगामी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत होणारी बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. संबंधित कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करून बदनामीकारक लेखन करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी करतानाच तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.या आंदोलनाचे नेतृत्व समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा साधनाताई माळी, माजी अध्यक्ष मीनाक्षीताई माळी, वंदना माळी, विद्या माळी, अंकिता माळी, गोकुळा माळी, प्रतीक्षा माळी, सुलभा माळी, रूपाली माळी, वैशाली माळी, इंद्रायणी चौगुले, ऋतुजा माळी, सृष्टी चौगुले यांनी केले. यावेळी अशोक माळी, गुरुबाळ माळी, बाबासाहेब चपाले, सुरेश माळी, अरविंद चौगुले, प्रकाश माळी, काशिनाथ माळी, संजय कोरे यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.
