भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत

सोलापूर : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील काही पदााधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीसाठी हा मोठा फटका असल्याचं मानलं जात होतं. मात्र, काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापुरात आणि जादू झाली भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नव उत्साह संचारला आहे.

🤙 8080365706