
मुंबई : साधारण 24 तासांपूर्वी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता मात्र या हवामानानं पुन्हा एकदा पलटी मारली आहे. कारण, पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा संपूर्ण विकेंड उष्णतेच्या झळा सहन करण्यातच जाणार आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. ज्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून तापमान दुपारी 2 वाजेपर्यंत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं या वेळात घराबाहेर न पडलेलंच बरं. समुद्रकिनारा नजीक असणाऱ्या मुंबई, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळंही उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.
