
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने कोल्हापूर शहरातील ६५० वृत्तपत्र विक्रेते ,नाना नानी पार्क येथे जेष्ठ नागरिक तसेच संघातील कर्मचारी यांना जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.

वृत्तपत्र विक्रेते यांना दूध वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात, तेही पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता. या विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे याबद्दल जागतिक दुग्ध दिनानिमित्त त्यांना गोकुळमार्फत सुगंधी दूध वाटप करण्यात आले.तसेच नाना नानी पार्क येथे जेष्ठ नागरिक यांना सुगंधी दूध वाटप प्रसंगी बोलताना डोंगळे म्हणाले कि गोकुळने ६० वर्ष पूर्ण करून गोकुळ संघाने ६१ व्या वर्षात पदार्पण केल्याने दुग्ध व्यवसायातील जेष्ठत्वाचा मान गोकुळ दूध संघास जातो त्यामुळे या वर्षीचा जागतिक दुग्ध दिन जेष्ठ नागरिकांच्या समवेत साजरा केल्यामुळे आमचा हि आनंद द्विगुणित झाला आहे. जेष्ठांनी तंदरुस्त आरोग्यासाठी दुधाचे महत्व हे पुढील पिढीपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे असे अवाहन केले. गोकुळ सोबत चवदार आयुष्य अनुभवणाऱ्या जेष्ठांनसोबत गेली ६१ वर्ष गोकुळने आपल्या उत्तम गुणवत्तेच्या जोरावरती ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे यामुळे गोकुळ हा आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्यातील भागीदार बनला आहे. दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळेच ज्येष्ठा पासून डॉक्टरांपर्यंत सर्वजण दूध पिण्याचा सल्ला देतात. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर कॅल्शियम असलेले दूध अत्यंत महत्त्वाचे असते. दूधाला पूर्णान्न मानतात त्यामुळे दूधाचा दैनंदिन जीवनात अधिक वापर असलाच पाहिजे. शारिरीक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. आजच्या जागतिक दुग्ध दिना पासून उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे दूध आपल्या दैनंदिनी अहारामध्ये वापर करण्यास सुरवात करावी.
गोकुळ परिवाराच्या वतीन जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या दोन्ही कार्यक्रम प्रसंगी अजित नरके , चेतन नरके , कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी चेअरमन अरुण डोंगळे , संचालक अजित नरके , चेतन नरके, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील,उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, तसेच वृतपत्र विक्रते जिल्हा अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, रणजीत आयरेकर,रघुनाथ कांबळे, नाना नानी पार्क मधील जेष्ठ नागरिक भीमराव दरेकर, दिलीप शहा, पूनम शहा व इतर कर्मचारी उपस्थित होते.
