मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 11 जून रोजी तपोवन मैदानात भव्य सभा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात केली असून, या उपक्रमांतर्गत रविवार दि.११ जून २०२३ रोजी सायं.५ वा,कोल्हापुरातील तपोवन मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी माहिती देताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरिक या सभेसाठी सहभागी होणार असून तपोवन मैदानावरती भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपाचे तीन स्वतंत्र्य मंडपात विभाजन केले जाणार आहे मधल्या मंडपात सभा आणि सुमारे 50,000 लाभार्थ्यांना पत्राचं वाटप, उजवीकडील बाजूच्या मंडपामध्ये आरोग्य शिबिर, तर डाव्या बाजूच्या मंडपामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॉल अशा स्वरूपामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली असून या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातून पात्र लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. तसेच या सभेसाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची जेवणाची व्यवस्था, पार्किंगची सुविधा करण्यात आलेल्या आहेत. तरी या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती तसेच लाभ घ्यावा असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले.या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706