शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

मुंबई : लवकरच जून महिना सुरू होणार आहे. जून महिना हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.मान्सूनची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

मान्सून २०२३ संबंधी हवामान खात्याकडून नवे अपडेट्स जारी करण्यात आले आहेत. १९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या १ जून रोजी मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.

🤙 8080365706