
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज मुख्य इमारतीच्या प्रागंणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन केले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे‚ मच्छिंद्र गोफणे संचालक‚ अहिल्यादेवी होळकर अध्यासन‚ अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन प्रभारी संचालक‚ सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र तसेच अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा शिवाजी विद्यापीठ‚ कोल्हापूर‚ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे डॉ. रामचंद्र पवार‚ विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड‚ सुरेश बंडगर सहा. कुलसचिव‚ अविनाश भाले सहा. प्राध्यापक तथा सहा. संचालक सामाजिक वंचितता विभाग‚ शरद पाटील व्यावसायिक सहाय्यक‚ सुरेश मोरे आदी उपस्थित होते.
