पाझर तलाव आंबवणे मधील प्रकल्पग्रस्तांना खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने 54 लाख 87 हजार मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खासगी जमिनी संपादन करताना येणाऱ्या अडचणींमुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास व पर्यायाने लाभधारकांना त्याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे खासगी जमिनी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने विकत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार पाझर तलाव आंबवणे (ता.भुदरगड) या प्रकल्पाच्या 45 प्रकल्पग्रस्तांना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने 58 लाख 67 लाख रुपये मंजूर झाले त्यापैकी 42 लाख 24 हजार सदर रक्क्मेचा धनादेशाचे वाटप आमदार प्रकाश आबिटकर व अधिकाऱ्यांच्या उपस्थित आज करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, पाझर तलाव आंबवणे प्रकल्पाचे काम सन 2006 साली सुरू झाले व ते सन 2008 साली पुर्ण झाले. प्रकल्प पुर्ण झाल्यापासून या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग याभागातील शेतकरी बांधवांसह नागरीकांना होत आहे. परंतू या प्रकल्पाकरीता जमीनी दिलेल्या शेतकरी बांधवांना अद्याप जमनींचे पैसे मिळाले नव्हते. या त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नवीन शासन निर्णयानुसार रक्कम मिळणे गरजेचे होते. त्याकरीता गेली अनेक वर्षापासून पाठपुराव सुरू होता या पाठपुराव्यास यश आले असुन पाझर तलाव आंबवणे या प्रकल्पाच्या 45 प्रकल्पग्रस्तांना खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने 54 लाख 87 लाख रुपये मंजूर झाले असून सदर रक्कमेचा फायदा प्रकल्पग्रस्तांना चांगल्या प्रकारे करून घ्यावा असे ते म्हणाले.यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर, ॲड.दुबूले, सुरेश घरपणकर, सुरेश घरपणकर, अशोक घरपणकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.फोटो : प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वाटप करताना आमदार प्रकाश आबिटकर सोबत उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर, ॲड.दुबूले, सुरेश घरपणकर, सुरेश घरपणकर आदी.

🤙 8080365706