
कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रकल्प सल्लागार दीपक देसाई (बिझनेस ब्रेन) यांना इंडियन अचिव्हर्स फोरम नवी दिल्ली तर्फे बायोइथेनॉल ह्या करिता उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी आणि राष्ट्र उभारणीतील योगदानासाठी मॅन ऑफ एक्सेलन्स 2023 हा पुरस्कार नुकताच देण्यात आला.

देसाई आणि त्यांची टीम 2003 पासून भारतात बायो इथेनॉलच्या वापरासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. कंपनी संपूर्ण भारतातील 28 पेक्षा जास्त प्लांट्ससाठी सल्लागार कार्यरत आहे. कंपनी गुंतवणूकदारांना संकल्पना ते इथेनॉल प्लांट कमिशनिंग आणि त्याचे मार्केटिंग साठी विविध साखर आणि धान्य आधारित इथेनॉल गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करते. त्यांच्या कंपनीकडून सुरुवातीला ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारना ही मार्गदर्शन होत. पुरस्कारानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना देसाई म्हणाले, भारतात 2003 पासून इथेनॉलचे महत्त्व समजून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. भारत आणि परदेशातील विविध माध्यमे आणि संघटनांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्टता मिळविण्यासाठी तुम्हाला मेट्रो शहरात असण्याची गरज नाही. तंत्रज्ञांना मुळे हे शक्य झाले आहे. फक्त तुम्हाला सातत्य ठेवणे आणि शिकत राहणे आवश्यक आहे. आपला पुरस्कार त्या क्लायंट्सना समर्पित करतो ज्यांनी त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि कुटुंब आणि मित्र यांनी चढ-उतारात साथ दिली.
