फुटून गेलेल्या नेत्यांना पुन्हा ठाकरे गटात प्रवेश देण्याबात संजय राऊत यांचं मोठं विधान

मुंबई : शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना ठाकरे गटात पुन्हा प्रवेश मिळणार की नाही? याची चर्चा अजूनही जोरात आहे. काहींच्या मते बदलत्या राजकीय परिस्थितीत फुटून गेलेल्या नेत्यांना पुन्हाठाकरे गटात प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण आदित्य ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी तसे सुतोवाच केलं होतं.  या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. ज्यांनी केवळ पैशासाठी बेईमानी केली त्यांना परत पक्षात प्रवेश देणार नाही. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्यात रोष आहे. त्यामुळे या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही, असं राऊत यांनी निक्षून सांगितलं.

🤙 8080365706