
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. परंतु या निर्णयाला सर्व स्तरावरुन चांगलाच विरोध होत आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, यासाठी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक असून संविधानाच्या अनुच्छेद 79 नुसार संसद भवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं देखील या याचिकेमध्ये म्हटलं आहे.