झोपडीधारकांना आता हक्काचं घर

मुंबई : 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयात पक्कं घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडपट्टीधारकांना फायदा होणार आहे. राज्य सरकारने झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम 1971 मधील तरतूदी नुसार राज्यातील महापालिका, नगरपालिकेतील 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यानच्या झोपडीधारकांचं सशुक्ल पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसआरए योजनेत सशुक्ल पुनर्वसनाला पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना पात्र करून त्यांच्याकडून वसूल करावयाच्या सदनिकेची किंमत ठरविण्यासाठी गृहनिर्माण विभागाने 7 सप्टेंबर 2018 रोजी परिपत्रक काढलं होतं.

🤙 8080365706