
पुणे : राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची माहिती राज्य मंडळाने जाहीर केली आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी, तसेच आपली श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची आणखी एक संधी दिली जाते. त्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची श्रेणीसुधार परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ मे पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
