
कोल्हापूर: राज्याच्या गृह विभागाकडून पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस बलच्या समादेशकपदी बदली झाली. तर बृहन्मुंबईचे पोलिस उपआयुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

पंडित लवकरच कोल्हापूरचा कार्यभार स्वीकारणार आहेत.नूतन पोलिस अधीक्षक पंडित मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे असून, ते २०१३च्या बॅचचे अधिकारी आहेत. नांदेड येथून त्यांच्या पोलिस दलातील सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर गडचिरोली येथे त्यांनी अपर पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी पार पाडली. नंदुरबार येथे पोलिस अधीक्षक पदावर त्यांनी लक्षणीय कामगिरी केली.
