पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत NDTV साठी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पीएम मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम आहे.

या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.

🤙 8080365706