
सोलापूर : सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय किसान सभेने इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातही गतवर्षी झालेल्या खरीप, रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळाले नाही.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही थकीत 385 कोटी रुपये शेतकर्यांना कारखानदारांकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ते बिल शेतकऱ्यांनी तात्काळ मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
