
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. डॉ. विनोद पवार यांची सातारा येथे बदली झाल्यामुळे त्यांची जागी डॉ. बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.

कोल्हापुरात येण्यापूर्वी डॉ. बाबर हे अकलूज येथे सहायक आयुक्त पदी कार्यरत होते. सोलापूर, सातारा येथेही त्यांनी काम केले आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आनंदा पोवार, प्रमोद खोपडे, आर. वाय. माने, निवृत्ती पाटील, दीपक तेली, रमेश चौगुले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
