
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष: विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. मित्र आणि भांवडाकडून सहकार्य लाभेल.
वृषभ: जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळु शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील.
मिथुन: शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल.
कर्कः यशवी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे.
सिंह : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील.
कन्या: कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल.
तूळ शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल.
वृश्चिक: कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा.
धनु: प्रवासातून लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील.
मकर: पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल.
कुंभ: मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
मीन: आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत.
